SBI खातेदारांचे ATM कार्ड करणार ब्लॉक
तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हांला सावध राहण्याची गरज आहे. जाणून घ्या का होऊ शकते तुमचे कार्ड ब्लॉक....
मेसेज येताहेत...
सध्या भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या खातेदाराला त्यांचे कार्ड कायमचे ब्लॉक करण्यात आले आहे, असा मेसेज पाठविण्यात आला आहे. बँकेने सुरक्षा कारणास्तव मॅग्नेटीक स्ट्रिपचे डेबिट कार्ड ईएमव्ही चीपच्या डेबिट कार्डशी बदलण्याची योजना आहे, त्यामुळे डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात येत आहे.
मोफत बदलले जाईल कार्ड...
रिझर्व बँकेने दिलेल्या गाइडलाइन्सचे पालन करताना स्टेट बँकने सुरक्षा कारणास्तव मॅग्नेटिक स्ट्रिपच्या एटीएम किंवा डेबिट कार्ड्सला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हांला एटीएम कार्ड बदलायचे असल्यास तुम्हांला बँकेत जावे लागणार आहे. तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर www.onliensbi.com वर जाऊन अर्ज करू शकतात. तुम्हांला स्टेट बँकेकडून ईएमव्ही चीप असलेले डेबिट कार्ड मिळेल, त्यासाठी कोणताही पैसा द्यावा लागणार नाही.
फेक कॉलपासून सावधान...
कार्ड ब्लॉक झाले आहे असे सांगून या काळात अनेक फेक फोन तुमच्या मोबाईलवर येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अशा फोनवर आपल्या खात्याची किंवा डेबिट कार्डाची माहिती देऊ नका. तुम्ही बँकेशी संपर्क साधून हे कार्ड बदलू शकतात. फक्त तुम्हांला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल.
कोणत्याही फेक कॉलला आपली माहिती द्यायची टाळा. डेबिट कार्ड नंबर, ओटीपी, सीव्हीसी नंबर देऊ नका. नाही तर तुमच्या खात्यातील पैसे गहाळ होऊ शकतात.
कधीपर्यंत मुदत
एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड बदलण्याची रिझर्व बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
स्रोत: झी २४ तास



