रिलायन्सचा 'जिओ फोन' लाँच; किंमत ० रुपया
येत्या १५ ऑगस्टपासून जिओ फोनची चाचणी सुरू होणार असून २४ ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी १५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात, असं मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. या जिओ फोनवर १५३ रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार असल्याची खुशखबरही अंबानी यांनी दिली. ५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे.
हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.
स्रोत:मटा




