आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करणं अगदी सोईस्कर झालं आहे.आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर करदात्यांना आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे.अगदी एका सोप्या स्टेप्स मध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता.
आयकर विभागाच्या ई-फायलिंग (https://incometaxindiaefiling.gov.in) वेबसाइटच्या होमपेजवर Link Aadhaar हा पर्याय देण्यात आला आहे. यावर क्लिक करून पॅन आणि आधार नंबर जोडता येणे शक्य आहे.
पॅन-आधारशी कसे लिंक कराल(Pan-Aadhaar Link):
1. सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होमपेजवर Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.किंवा https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.aspx या लिंक वर जाऊन हि तुम्ही लिंक आधार फॉर्म भरू शकता.
नमूद केलेल्या फॉर्म मध्ये तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक,आधार कार्ड वर जे नाव ते फॉर्म मध्ये नमूद करा/लिहा.
2. जर तुमच्या आधारकार्ड वर फक्त जन्मवर्ष नमूद केलेलं असेल तर खालील बॉक्स मध्ये क्लिक करा.
3. सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दर्शवलेल्या इमेज मध्ये दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल अथवा तुम्ही दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पर्याय निवडू शकता जो की तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पाठवून व्हेरिफिकेशन करण्यासाठी वापरू शकता.तुम्ही दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन होईल आणि आधार व पॅन लिंक झाल्याचा संदेश पेजवर दिसेल.
4.
जर माहिती देण्यास काही चूक झाली तर दुसऱ्यांदा तुम्हाला पुन्हा सर्व माहिती द्यावी लागेल.