हे सर्वानी लक्षात घ्यायला हवं किंवा अनोळखी फोनधारकाला आपण खालील प्रश्न आपल्या सतर्कते साठी विचारू शकतो.
१.अनोळखी फोनधारका बँक च्या कोणत्या शाखेतून बोलत आहेत.
२. शाखेचा पूर्ण पत्ता.
३.आपण कोणत्या बँकेचा डेबिट कार्ड वापरात आहेत हे त्याच्या कडुन जाणून घ्या.
अशा रीतीने आपण दक्ष राहू शकतो.
जग हे इंटरनेट शी जोडल गेलेले आहे.जगात सरासरी लोक व्हाट्स अँप सारख्या सोशल सुविधांचा वापर करत आहेत.अगदी खेड्या पाड्या पर्यंत याच नेटवर्क पोहचल आहे.याचा वापर सहज आहे पण तेवढच घातक ठरू शकतो.व्हाट्स अँप सारख्या साधनांचा वापर तुमची वैयक्तिक माहिती चोरण्या साठी होऊ शकतो याकडेही लक्ष असू द्या.ऑनलाईन शॉपिंग सारख्या डमी लिंक साईट तयार करून आणि ऑफरच आमिष दाखवून तुमची वैयक्तिक माहिती, तुमच स्थान तसेच बँक माहिती मागवली जाते आणि तुमची फसवणूक केली जाते. असे प्रकार राजरोस पणे घडत आहेत.
व्हाट्स अँप वर ग्रुप मध्ये जसे कि मोबाईल वर ८०% सूट ,कपडे,इत्यादी वर भरगोस सूट देत आहोत असे भासवून नमूद केलेल्या साइटच्या लिंक वर आपली माहिती, बँक व कार्ड्स ची माहिती नोंदवून व इतर ग्रुप वर फॉरवर्ड करण्यास सांगून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो आणि अति उत्साह पोटी आपण कोणती हि खातर जमा न करता आपली माहिती,मोबाईल नंबर इत्यादी पुरवतो.अशा काही गोष्टी आहेत आपण ऑनलाईन खरेदी करताना लक्षात ठेवायला पाहिजेत.
१. नमूद केलेली साइट लिंकची खात्री करून घ्या.
२.ऍमेझॉन,फ्लिपकार्ट सारख्या साईट वर जाऊन ऑफर चेक करा आणि मगच खात्री करा.
३.आपण ऑनलाईन वर दिलेली डमी लिंक साइट चुकीची अथवा फ्रॉड तर नाही ना याची खात्री करू शकता.
अशा प्रकारे आपण सतर्क राहून होणार नुकसान टाळू शकतो.



