मतदार यादीत शोधा आपले नाव
यासाठी तुम्हाला http://103.23.150.139/marathi/ या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.चला तर मग पाहूया कसा शोधाच आपलं नाव मतदार यादीत.
संकेतस्थळावर भेट दिल्यावर सर्वप्रथम तेथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील १. नावाने सर्च करा २. आय कार्ड चा उपयोग करून सर्च करा.
पर्याय १. नावानुसार शेअरच करणार असाल तर त्यापुढे क्लिक करा.
२. आय कार्ड चा उपयोग करून सर्च करत असाल त्यापुढे क्लिक करा.
पर्याय १. नावानुसार शेअरच करणार असाल तर त्यापुढे क्लिक करा.
आता तुमचे नाव जिल्हामध्ये शोधण्यासाठी डिस्ट्रिक्ट पुढे क्लिक करा.
एक फॉर्म ओपन होईल त्यात तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव लिहा.आणि सर्च बटण वर क्लीक करा.
वरील सर्व माहिती बरोबर असल्यास तुमचे पूर्ण माहिती जसे कि मतदानाचा पत्ता, तुमचे नाव, वय, मतदानाचा क्रमांक याची संपूर्ण माहिते प्रदर्शित होईल ही माहिती तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.
पर्याय २.आय कार्ड चा उपयोग करून सर्च करत असाल त्यापुढे क्लिक करा.
यामध्ये तुम्हाला तुमचा मतदानाचा आयडी क्रमांक माहित असणे आवश्यक आहे यात जिल्हा निवडून तुमचा मतदानाचा आयडी क्रमांक लिहावा लागतो आणि त्यापुढील सर्च चे बटण दाबून तुम्हाला आवश्यक माहिती प्रदर्शित होईल ही माहिती तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.



