चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती अशा या श्री गणरायाची अनेकविध रूपे आपणास माहीत आहेत. तसेच एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र अशी नानाविध नावेदेखील ठाऊक आहेत. परंतु जर आपल्या प्रत्येकाच्या नावातून आपल्या या लाडक्या देवतेचे अक्षरशिल्प तयार झाले तर...आणि म्हणूनच आपल्याला आपल्या स्वतःच्या नावात दडलेल्या अक्षरगणेशाची प्रचिती यावी याकरता आता श्री.राज कांदळगावकर सरानी तुमच्या नावातुन दर्शवणारा पहिला अक्षर गणेश कलाकार श्री.राज कांदळगावकर सरानी घडवलेली अक्षरगणेशांची विविधांगी रूपे तुम्ही पाहू शकता जी दडलेली आहेत तुमच्याच विविध नावांत.
राज सर म्हणतात "खरंतर मी अक्षरगणेश साकारत नाही, तर प्रत्येकाच्या नावातच तो दडलेला असल्याने मी फक्त त्यास मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो."अशा या अनोख्या अक्षरगणेश कलेची इंटरनेट माध्यमातुन कलारसिकांना ओळख व्हावी, नवकलाकारांना त्याद्वारे प्रेरणा मिळावी आणि या कलेला मान्यताप्राप्त दर्जा मिळावा ह्या हेतूंनी आपणासाठी भारतातील पहिला अक्षरगणेश कलाकार श्री.राज कांदळगावकर सरांची माहिती आपणास व्हावी हा आमचा प्रयत्न.
अक्षरगणेशांची विविधांगी रूपे पाहण्यासाठी क्लिक करा : अक्षरगणेश
सोजन्य:अक्षरगणेश




