असे करा व्हाटसअँप वर कॉन्टॅक्ट ब्लॉक
१. सर्वप्रथम आपल्या मोबाईल वर व्हाट्सअँप उघडा.
२. व्हाट्सअँप स्क्रीन वरील सर्वात वरील उजव्या बाजूला तीन डॉट्स वर क्लिक करा.
३. तेथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील यामधील सेटीन्ग्स हा पर्याय दिसेल. तेथे क्लिक करा.
४. सेटिंगस पानावरील अकाउंट पर्यायावर क्लिक करा.
५. अकाउंट पानावर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामधील Privacy पर्यायावर क्लिक करा.

६.आता Privacy पानावर Messaging च्या खाली Blocked Contacts नावाचा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा.Blocked Contacts मध्ये वरील उजव्या बाजूस कॉन्टॅक्ट टॅब वर क्लीक केल्यावर तुमच्या संपर्क यादीतील संपर्क क्रमांक ब्लॉक करावयाचा आहे तो निवडा.निवडलेला क्रमांक ब्लॉक यादी मध्ये तुम्हाला दिसेल.

अशा प्रकार तुम्ही नको असलेले कॉन्टॅक्ट व्हाट्सअँप मध्ये ब्लॉक करू शकता.









