मुलगा प्रिन्सिपलकडे गेला आणि म्हणाला, "मॅडम, आता मी शाळेत येणार नाही."
प्रिन्सिपलने विचारले "पण का?"
मुलगा म्हणाला " मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ;
कर्मचारी चांगले नाहीत ;
विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक चुकीच्या गोष्टी होतात"
प्रिन्सिपल ने उत्तर दिले "ओके. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो ते काम करा: एका काचेच्या प्यालात पाणी घ्या आणि एकही थेंब न सांडता शाळेभोवती तीन वेळा चक्कर मारा व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड "
मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे...
प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले.
प्रिन्सिपलने विचारले "जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?"
त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."
" सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?"
"नाही"
"शिक्षक शिकवताना पाहिले का?"
"नाही"
तेव्हा प्रिंसिपल त्याला म्हणाले की
"तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास.
आपल्या आयुष्याचेही असेच आहे . जेव्हा आपण आपले लक्ष्य/ध्येय (Target) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो "
👉मतितार्थ...
इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व त्यालाच प्राधान्य द्या
========================================================================
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा... आणि निश्चित ध्येय गाठा...
==================================================
"डोळे" हे तलाव नाहीत,
तरीपण भरून येतात.
"अहंकार" हा शरीर नाही,
तरीपण घायाळ होतो.
"दुश्मनी " ही बीज नाही,
तरीपण उगवली जाते.
"ओठ " हे कापड नाहीत,
तरीपण शिवले् जातात.
"निसर्ग" हा बायको नाही,
तरीपण कधीतरी रुसतो.
"बुध्दी" ही लोखंड नाही,
तरीपण तिला गंज लागतो.
"माणूस" हा वातावरण नाही,
तरीपण तो बदलला जातो.।।
🐾🌹काळजी घ्या 🌹🐾
🍁🌴🙏🌴🍁
💐🌸आयुष्य खूप सुंदर आहे💐🌸
💐🌸 बंध आपुलकीचे 💐
💐नाते माणुसकीचे💐
=======================================================================
एखादयाजवळ आपल्या अश्या
आठवणी ठेवून जा..,
कि नंतर त्यांच्या जवळ आपला
विषय जरी निघाला तर त्यांच्या
ओठांवर थोडस हसू आणि
डोळ्यात थोडस पाणी
नक्कीच आलं पाहिजे..!
पैशाने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने श्रीमंत रहा
=======================================================================
न हरता... न थकता... न थांबता...
प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं...
👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच..
=======================================================================
"Impossible" ला
नीट पाहा हा स्वतःहा म्हणतो
""I m Possible""
फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि
असहज गोष्ट सहज करा।
"उदास होण्या करता संपूर्ण आयुष्य आहे,
"नजर वर करुन पहा समोर जीवन उभ आहे,
👉 Be positive...Be Happy
Believe in yourself
🌿🌺💐🌺🌿
========================================================================
मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत...नाही का...
"विचार" असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे.



