-->

news-bar 1

न हरता... न थकता... न थांबता...
         प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं...
👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच..
---------------
आयुष्य कठीण अजिबात नसतं . . 

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .

कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .

कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??

ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं
🌿🌼💐🌿🌼💐🌿🌼💐💐.
========================================================================
🔅🔅खुप सुंदर विचार🔅🔅
       एके दिवशी चिमणी ने मधमाशीला विचारले की तु इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का.....? तेव्हा मधमाशी खुप सुंदर उत्तर देते...........ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध बनवण्याची कला नाही घेवु शकत..........
       या संपूर्ण जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमच TALENT  कोणीही घेवु शकत नाही म्हणुन आनंदी रहा............👍

असे करा आधार कार्ड -पॅन कार्डसोबत लिंक

आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करणं अगदी सोईस्कर झालं आहे.आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर करदात्यांना आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

मोफत संगणक शिका आणि प्रमाणपत्र मिळवा.

संगणक आपल्याला सुशिक्षित बनवतेच पण जगाची ओळख पण करून देते. आज जगात संगणक साक्षर असणे तितकेच महत्वाचे आहे.आपण घरबसल्या संगणक शिकू शकता हो आणि ते पण अगदी मोफत आणि कोणाचीही मदत न घेता.

वाचा महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्र

आज जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये सुविधा पोहचली आहे व घरबसल्या आपण अनेक चॅनेल पाहत असतो बाजारातही अशा सुविधा पुरवणारी कंपन्या पण अनेक आहेत.अशाच काही पुरवणाऱ्या सेवांचा आपण ओळख करून घेऊयात.

तुमच्या नावातुन दर्शवणारा पहिला अक्षर गणेश कलाकार

चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती अशा या श्री गणरायाची अनेकविध रूपे आपणास माहीत आहेत. तसेच एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र अशी नानाविध नावेदेखील ठाऊक आहेत. परंतु जर आपल्या प्रत्येकाच्या नावातून आपल्या या लाडक्या देवतेचे अक्षरशिल्प तयार झाले तर...

आरोग्य संपदा

आरोग्य संपदा